महाराष्ट्र

मावळ लोकसभा मतदारसंघात पुन्हा श्रीरंग बारणेच; 'या' मतदारसंघांतून विजयी वाटचाल

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळत असताना मावळ मतदारसंघात पुन्हा श्रीरंग बारणेच प्रचंड मताधिक्याने निवडून आले...

Swapnil S

राजकुमार भगत/उरण

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळत असताना मावळ मतदारसंघात पुन्हा श्रीरंग बारणेच प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. श्रीरंग बारणे हे संजोग वाघेरे पाटील यांच्यापेक्षा जवळजवळ १ लाख ८९ हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने मावळची जागा प्रतिष्ठेची केली होती आणि सर्वात अगोदर संजोग वाघेरे यांची उमेदवारी घोषित केली होती. मात्र युतीपुढे त्यांचे काही चालले नाही, उरण विधानसभा मतदारसंघात देखील बारणेंनी २ हजारांच्या आसपास आघाडी घेतल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास निर्माण झाला आहे.

या मतदारसंघातून विजयी वाटचाल

उरण विधानसभा मतदारसंघातील उलवे नोडमध्ये बारणेंना चांगली आघाडी मिळाली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या उलवा वहाळमध्ये बारणे यांनी आघाडी घेतली होती. उरण शहर, चाणजे विभाग येथे बारणेंना मताधिक्य मिळाले. चिरनेर विभाग, जासई विभाग येथे वाघेरेंनी चांगली मते घेतली आहेत. मुस्लिम बहुल भागात काही ठिकाणी एक गठ्ठा मतदान वाघेरेंच्या वाटेला आले असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

कर्जतमध्ये आतषबाजी

देशाच्या १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला होता. बारणे यांनी या विजयाच्या निमित्ताने हॅटट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संज्योग वाघेरे पाटील यांचा पराभव केला आहे. दुपारी १९ फेऱ्याअंती एक लाखाच्या घरात गेल्यावर शिवसैनिकांनी कर्जतमध्ये मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. अनेकांनी मतदानाचा दिवस ते मतमोजणीपर्यंत अनेक अंदाज वर्तविले होते. कर्जतमध्ये सर्व पक्षांच्या कार्यालयामध्ये निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवसैनिकांनी कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे एकत्र येऊन जल्लोष केला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, माजी नगरसेवक संकेत भासे, विभाग प्रमुख रत्नाकर बडेकर, अशोक मोरे, भानुदास धुळे, विलास मोडक, राकेश दळवी, शाम पवाळी, विश्वनाथ थोरवे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी