आता सिंधुदुर्ग विमानतळ अहोरात्र सुरू; DGCA ची मंजुरी | RBI 
महाराष्ट्र

आता सिंधुदुर्ग विमानतळ अहोरात्र सुरू; DGCA ची मंजुरी

सिंधुदुर्ग विमानतळाला कमी दृश्यमानता आणि प्रतिकूल हवामानातही २४ तास विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा नियामकाची (डीजीसीए) मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सने दिली.

Swapnil S

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग विमानतळाला कमी दृश्यमानता आणि प्रतिकूल हवामानातही २४ तास विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा नियामकाची (डीजीसीए) मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सने दिली.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे संचालित या विमानतळावर ऑक्टोबर आहे. २०२१ पासून व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू '२४x७ सर्व हवामानात संचालनास मिळालेली मंजुरी विमानतळाची विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करेल. यामुळे विमान कंपन्यांचा विश्वास वाढेल, सातत्यपूर्ण प्रवासी वाहतुकीला चालना मिळेल आणि कोकण प्रदेशातील आर्थिक तसेच पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असे आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार व प्रमुख जय एस. सदाना यांनी सांगितले.

या विमानतळाला इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स (आयएफआर) अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यामुळे कमी दृश्यमानता आणि प्रतिकूल हवामानातही विमानांचे सुरक्षित संचालन शक्य होणार आहे.

या मंजुरीत उपग्रह-आधारित 'रिक्वायर्ड नेव्हिगेशन परफॉर्मन्स' प्रक्रियांचा समावेश असून पर्यायी (बॅकअप) नेव्हिगेशन सहाय्याची उपलब्धताही आहे. या सर्व प्रणालींमुळे वैमानिकांना इन्स्ट्रुमेंट अप्रोच मार्गदर्शन मिळते, तसेच उपग्रहावरील प्रणाली निकामी झाल्यास विश्वासार्ह पर्याय उपलब्ध राहतो. परिणामी वर्षभर सर्व प्रकारच्या विमानांचे सुरक्षित लँडिंग आणि अधिक विश्वासार्ह उड्डाण संचालन सुनिश्चित होते.

नाईट लँडिंगला परवानगी मिळण्यासाठी खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर चिपी विमानतळ येथे 'नाईट लँडिंग'साठी आवश्यक असणारा विद्युत पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हा नियोजनमधून अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे चिपी विमानतळाला आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत झाला आणि पुढील परवानगी मिळण्यास सोईचे ठरले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स