भारतीय रेल्वे Indian Railway
महाराष्ट्र

‘त्या’ १६ गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा न दिल्यास ठिय्या; प्रवासी संघर्ष समितीचा इशारा, सिंधुदुर्ग स्थानकाबाहेर धरणे आंदोलन

कोकण रेल्वे मार्गावरून देशातील विविध भागांहून धावणाऱ्या १६ लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही स्थानकावर थांबा दिला जात नाही, ही बाब संतापजनक असून अन्यायकारक आहे.

Swapnil S

राजन चव्हाण/सिंधुदुर्गनगरी

कोकण रेल्वे मार्गावरून देशातील विविध भागांहून धावणाऱ्या १६ लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही स्थानकावर थांबा दिला जात नाही, ही बाब संतापजनक असून अन्यायकारक आहे. जर या गाड्यांना त्वरित थांबा देण्यात आला नाही, तर एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा सक्त इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने दिला आहे.

या मागण्यांसह इतर स्थानिक समस्यांवर सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाबाहेर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असून सर्व प्रवासी, ग्रामस्थ, रिक्षा संघटना व सरपंचांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सध्या कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांना भेटी देत आहेत. आज त्यांनी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

यानंतर 'वेटिंग रूम'मध्ये झालेल्या तीन तासांच्या बैठकीत, जिल्ह्यातील नऊ स्थानकांवरील सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. गणेश चतुर्थीपूर्वी स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली, तर धोरणात्मक निर्णयांसाठी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

समितीचा आक्रमक पवित्रा

प्रवासी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनासमोर प्रश्नांची सरबत्ती करत कोकणातील १०० किमी ट्रॅकवर असलेल्या ९ स्थानकांपैकी एकाही स्थानकावर गाड्या का थांबत नाहीत? असा सवाल उपस्थित केला. सिंधुदुर्ग आणि कोकणवासीयांवर हा सरळ अन्याय आहे, आणि तो आम्ही सहन करणार नाही, असा ठणकावाही या वेळी करण्यात आला.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास