महाराष्ट्र

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी

कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा नाहक बळी जाण्यापूर्वी कुत्र्याचा योग्य बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ काही संपायचं नाव घेत नाही आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्येदेखील वाढ होत आहे. त्यातच पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हांडेवाडी येथील कुमार पेबल पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या कुत्र्यांमुळे सोसायटीमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे. या हल्ल्यानंतर महापालिकेचं श्वान पथक दाखल झालं मात्र त्याच सोसायटीतील एका प्राणीप्रेमी महिलेने कुत्र्यांना महापालिकेकडे सोपवण्यास नकार दिला आहे. मात्र याच कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागल आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी महिलेवर संताप व्यक्त केला आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे सोसायटीच्या आवारात मुलांना खेळता येत नाही शिवाय वयस्कर नागरिकांनादेखील या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा नाहक बळी जाण्यापूर्वी कुत्र्याचा योग्य बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. श्वानफिडर आणि भटक्या कुत्र्यांची संख्या या दोन्हींवर तातडीने आणि निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिकेला केली असून, रहिवाशांना होणारा धोका लक्षात घेता त्यांनी पालिकेला विनंती केली आहे.

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरू

PF खातेधारकांनो लक्ष द्या! UAN सक्रिय नसेल तर EPFO च्या अनेक सुविधा वापरता येणार नाहीत; 'या' स्टेप्स फॉलो करा

बेसमेंटमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; अत्याचारानंतर हत्येचा आरोप

Swiggy Instamart अडचणीत; मुदत संपलेल्या आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांच्या तक्रारींवर FSSAI ची कारवाई

प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद