महाराष्ट्र

Solapur : नाशिकनंतर सोलापूरमध्येही भीषण स्फोट; तीन जणांचा मृत्यू

सोलापूरच्या (Solapur) बार्शीतील पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला.

प्रतिनिधी

नववर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र दोन आगीच्या घटनांनी हादरला. एकीकडे नाशिकमधील घटना ताजी असतानाच दुसरीकडे सोलापूरच्या (Solapur) बार्शीमध्येही एका फटका फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. ही घटना बार्शी तालुक्यातील पांगिरा गावाजवळ घडली असून यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला. यावेळी तिथे अंदाजे ४० कामगार काम करत होते.

बार्शीमध्ये झालेल्या या स्फोटामध्ये ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर जखमींना तातडीने उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि स्फोटानंतर झालेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये ६ ते ७ कर्मचारी गंभीर जखमी झाले. अद्याप आगीचे कारण कळू शकलेले नाही.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत