महाराष्ट्र

क्रुझर गाडीचे टायर फुटून ५ जागीच ठार! देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर सोलापूरमध्ये काळाचा घाला

या गाडीतील प्रवासी सोलापूरहून नळदुर्गकडील खंडोबा मंदिराकडे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशीवमधील अणदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले

Swapnil S

सोलापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझर जीपला सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्रुझर गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला असून त्यातील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

या गाडीतील प्रवासी सोलापूरहून नळदुर्गकडील खंडोबा मंदिराकडे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशीवमधील अणदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, जोर लावून क्रुझर गाडी सरळ केली. मात्र त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले असून सर्व प्रवासी दक्षिण सोलापूरच्या उळेगाव येथील आहेत.

पुजा हरी शिंदे (वय ३०), सोनाली माऊली कदम (वय २२), साक्षी बडे (वय १९) अशी मृत महिलांची नावे आहेत. जखमींमध्ये आकाश कदम, हरीकृष्ण शिंदे, माऊली कदम, अंजली आमराळे, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, कुणाल शिंदे, श्लोक शिंदे, बालाजी शिंदे, शिवांश कदम, कार्तिक आमराळे यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त

आज होणाऱ्या TET परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजारांहून अधिक नोंदणी; गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV सह Ai तंत्रज्ञानाचा वापर

बाणगंगा तलाव पुनरुज्जीवन दुरुस्तीच्या कामाला ब्रेक; पुरातत्त्व विभागीय कार्यालयाची कारवाई

मराठी शाळा बंदचा डाव! मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा आरोप; निर्गमित आदेश मागे घेण्याची मागणी