महाराष्ट्र

"औरंगजेब हा..." धमकीनंतर सपाचे नेते अबू आझमी यांचे मोठे विधान

प्रतिनिधी

औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर मिळालेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "औरंगजेब हा महान बादशहा होता. त्याच्याविरोधात मी काहीच चुकीचे ऐकून घेणार नाही. अशा धमक्या मला येतच असतात. आम्ही देशप्रेमी आहोतच, मात्र कट्टपंथीयांना ते आवडत नाही. याआधीही अशा धमक्या आलेल्या आहेत. मात्र, पोलिसांनी कधीच काही ठोस कारवाई केली नाही."

नेमकं प्रकरण काय?

सपाचे नेते अबू आझमी यांना एका इसमाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या स्वीय्यसाहाय्याकडे त्यांचा फोन होता. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अबू आझमी म्हणाले होते की, "औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता. त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल, तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल. हिंदूंवर हल्ले होत असतील तर मुस्लीमांवरही हल्ले होतात" असे विधान त्यांनी केले. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस