महाराष्ट्र

राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरण; तनपुरे, अर्जुन खोतकरांना दिलासा

Swapnil S

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी प्राजक्त तनपुरे, अर्जुन खोतकर यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने दिलासा दिला. राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात जालना सहकारी साखर कारखान आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिंदे गट शिवसेना माजी आमदार अर्जुन खोतकर आणि जुगलकिशोर तापडिया, समीर मुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दिलासा दिला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या सर्वाना २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या सर्वांना समन्स बजावून न्यायालयात हजर रहाण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार, सर्वांनी न्यायाधीश रोकडे यांच्या न्यायालयात हजेरी लावली. यावेळी रणजीत देशमुख यांच्या सर्वांनी जामीनासाठी अर्ज केला. रणजीत देशुख आजारी असल्याने त्यांना वैद्यकिय कारणास्तव तातडीने जामीन मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली. यावेळी ईडीने या सर्वांचा जबाब नोंदविलेला असल्याने जामीन अर्जाला विरोध केला नाही. याची दखल घेत न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस