महाराष्ट्र

कराडच्या कृष्णा कारखान्यास साखर आयुक्तांची सदिच्छा भेट

जीवाणू खत प्रकल्प उभारणी व एकरी १०० टन उत्पादन वाढ योजनेची माहिती त्यांना देण्यात आली

नवशक्ती Web Desk

कराड : राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कृष्णा कारखान्यातील विविध प्रकल्पांना भेटी देऊन, कारखान्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. प्रारंभी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सायली पुलकुंडवार यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. पुलकुंडवार यांनी कारखान्याच्या आधुनिकीकरण कामाची पाहणी केली. कारखाना राबवित असलेल्या सभासद हिताच्या योजनांची माहिती, मोफत घरपोच साखर, जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत जीवाणू खत प्रकल्प उभारणी व एकरी १०० टन उत्पादन वाढ योजनेची माहिती त्यांना देण्यात आली.

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर; शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान; स्वतंत्र वेळापत्रक जाहीर

पावसाला सुट्टी नाहीच! रविवारचा दिवस पावसाने गाजवला; मुंबई शहर, उपनगरात धुवांधार कायम