महाराष्ट्र

सुनेत्रा पवार यांची निवड कायदेशीर; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा निर्वाळा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची झालेली निवड कायदेशीर, पक्षाच्या घटनेनुसार आणि सर्व नियमांचे पालन करूनच करण्यात आल्याचा निर्वाळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केला.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची झालेली निवड कायदेशीर, पक्षाच्या घटनेनुसार आणि सर्व नियमांचे पालन करूनच करण्यात आल्याचा निर्वाळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केला.

पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर पक्षात विसंवाद असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष निवडीला पक्षातून आव्हान देण्यात आले आहे. याशिवाय पक्षाचे नेते प्रफुल पटेल हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि नेते पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती. पक्षाच्या संविधानातील सर्व तरतुदी आणि लोकशाही पद्धतींचे पालन करूनच ती पार पडली आहे.”

सच्चिदानंद सिंह यांनी पाठविलेल्या कायदेशीर नोटिशीचा अभ्यास करून गरज असेल तरच त्याला कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल. अन्यथा या नोटीसला केराची टोपली दाखवली जाईल. त्यांनी केलेल्या आरोपांना कोणताही आधार नाही. पक्षात कोणतीही फूट किंवा मतभेद नाहीत. काही जण विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. सच्छिदानंद सिंह यांच्याशी आपला काहीही संपर्क नसल्याचे सांगत या पत्रामागे कोण असेल असे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणताही अंतर्गत संघर्ष नाही -पटेल

पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षात कोणताही अंतर्गत संघर्ष नसल्याचा दावा केला आहे. पक्षातील सर्व वरिष्ठ नेते सुनेत्रा पवार यांच्यासोबत बसून राजकीय विषयांवर चर्चा करतात. सच्चिदानंद सिंह यांनी लिहिलेल्या पत्राला फारसे महत्त्व नाही. पक्षहितासाठी कोणताही प्रश्न सामंजस्याने सोडविला जाईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती