महाराष्ट्र

Supreme Court Hearing : "मंगळवारी सुधारीत वेळापत्रक द्या, अन्यथा नाईलाजास्तव...", सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना झापलं

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रजून यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असून सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती करण्यात आली. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रजून यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसल्याचीही न्यायालयाने यावेळी म्हटलं. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, तुम्ही आदेशाची पायमल्ली करत आहात. सुधारीत वेळापत्रक मंगळवारपर्यंत देण्यात यावं. विधासभा अध्यक्षांनी दिलेलं वेळापत्रक अमान्यकरत न्यायालयाने त्यांना नवीन वेळापत्रत देण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सोमवारपर्यंत वेळापत्रक सादर करावं. अन्यथा आम्ही आदेश देऊ असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष पद हे घटनात्मक जरी असलं तरी आम्ही आदेश देऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही. मंगळवारी (१७ ऑक्टोबर) नवं वेळापत्रक सादर करावं. जर निश्चित वेळेत अध्यक्षांकडून येऊ शकलं नाही. तर मात्र नाईलाजास्तव सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट टाईमलाईन आखून द्यावी लागले. दोन महिन्यांची टाईमलाईन असून शकते. ज्यात अध्यक्षांना निर्णय घेणं बंधनकारक असणार आहे.

पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय न घेतल्यास विधासभा अध्यक्षांसमोरील कारवाई निरर्थक ठरेल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास