महाराष्ट्र

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

तब्बल 20 वर्षांनंतर मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांचं एकत्र येणं जितकं महत्त्वाचं होतं तितकंच लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या पुढच्या पिढीने! यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील एकत्र आले. यावेळी ठाकरे कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

नेहा जाधव - तांबे

तब्बल 20 वर्षांनंतर मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांचं एकत्र येणं जितकं महत्त्वाचं होतं तितकंच लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या पुढच्या पिढीने! यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील एकत्र आले. यावेळी ठाकरे कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळे या व्यासपीठावर ठाकरे कुटुंबीयांची तिसरी आणि चौथी पिढीही एकत्र पाहायला मिळाली.

या सोहळ्यात सुप्रिया सुळे या केवळ पाहुण्या नव्हत्या, तर त्यांची उपस्थिती एक महत्त्वाचा 'जॉइनिंग पॉईंट' ठरली. व्यासपीठावर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्रित फोटो काढत असताना सुप्रिया सुळे यांनी अमित आणि आदित्य यांचा हात पकडला आणि दोघांना आपापल्या काकांच्या शेजारी जाऊन उभं केलं. यावेळी आदित्य हे राज ठाकरे यांच्या शेजारी उभे राहिले पण अमित ठाकरे उभे राहिले नाहीत. यावेळी राज ठाकरे यांनी खुनवून अमित यांना जवळ बोलावले आणि त्यावेळी ते आपल्या काकांच्या शेजारी उभे राहीले. त्यामुळे एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. या निमित्ताने वेगळे झालेले केवळ भाऊच नव्हे तर वीस वर्षांनी पुतणे देखील आपल्या काकांना भेटल्याचे पाहायला मिळाले.

मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. या फोटोमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते दिसले. राज ठाकरे हे राजकीय कारणाने बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून विभक्त झाले असले तरी त्यांचे काका-पुतण्याचे नाते आणि संस्कार राज ठाकरे यांनी वेळोवेळी भाषाणातून व्यक्त केले आहे. आजच्या कार्यक्रमातही तीच आपुलकी आणि कौटुंबिक एकजूटता दिसून आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतभेद विसरून दोन्ही ठाकरे बंधू युतीसाठी एकत्र येतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत