महाराष्ट्र

अंबादास दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबन आणि विधीमंडळ परिसरात प्रवेश बंदी

Suraj Sakunde

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईतील विधानभवनात सुरु आहे. काल (१ जुलै) अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाड लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यादरम्यान अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता. दरम्यान या प्रकरणी अंबादास दानवे यांचं सदस्यत्व पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आलं आहे. तसेच या पाच दिवसांत त्यांना सभागृहात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईनंतर विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली आणि कामकाजावर बहिष्कार घातला आहे.

राहुल गांधींच्या लोकसभेतील वक्तव्याचे विधानपरिषदेत पडसाद-

सध्या दिल्लीतील नवीन संसद भवनात संसदेचं अधिवेशन सुरु आहे. काल लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला धारेवर धरलं. दरम्यान हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. याचे पडसाद काल विधानपरिषदेमध्ये उमटले. प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निषेध ठराव आणि सुमोटा आणवा, नाहीतर आम्ही सभागृह चालू देणार नाही, अशी मागणी केली.

अंबादास दानवेंकडून प्रसाद लाड यांना शिवीगाळ-

त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही निषेध प्रस्ताव लोकसभेला पाठवावा अशी मागणी केली. त्यांनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, हा मुद्दा लोकसभेतील आहे, त्याचा आपल्या कामकाजाशी संबंध येतो का? असा सवाल उपस्थित केला. यादरम्यान अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यादरम्यान संतापलेल्या अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन-

दरम्यान आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं. तसेच या पाच दिवसांमध्ये अंबादास दानवे यांना सभागृहात येण्सासही बंदी घातली आहे.

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना