एकनाथ शिंदे  संग्रहित फोटो
महाराष्ट्र

तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली आहे.

Swapnil S

मुंबई/नागपूर : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली आहे. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ, महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचे ऐतिहासिक काम केले. गेल्या अडीच वर्षांत विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुट्टी न घेता आम्ही काम केले. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला. गेली अडीच वर्षे आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आमचे सरकार हे जनतेचे ‘लाडके सरकार’ झाले. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.

विदर्भाच्या विकासासाठी ठोस पावले !

विदर्भाशी माझे वेगळे नाते आहे, ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. मुख्यमंत्री असताना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे. गेल्या दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागलेत. समृद्धी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कम आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करायचा आहे. विदर्भ, मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली असल्याचे शिंदे म्हणाले.

राज्यात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे

महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग सुरू करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला आम्ही मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरू आहेत. सात हजार किमी ॲक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करतोय. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये, असे आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत