PM
महाराष्ट्र

फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट होऊन चिमुकला ठार

स्फोटचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Swapnil S

नागपूर : फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या. नागपुरातील जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात ही घटना घडली आहे. जखमी महिलांवर शहरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सिझान आसिफ शेख असे या स्फोटात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून फारिया हबीब शेख (२८) आणि अनमता हबीब शेख (२४) असे जखमी महिलांची नावे आहेत. या घटनेनंतर फुगेवाला फरार झाला आहे. सिलेंडरचा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समोर येऊ शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान व्हीसीए मैदानावर एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता. ख्रिसमस सुट्ट्या असल्याने सिझान मावशी फारिया व अनमता यांच्यासोबत फिरायला येथे आला होता. फुगेवाल्याला पाहून सिझानने फुगे घेण्याचा हट्ट केला. त्यानंतर ते तिघे फुगेवाल्याकडे गेले. यावेळी फुग्यात गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानाक स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की सिलेंडर हवेत उडाला. स्फोटचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चिमुकल्या सिझानचा मृत्यू झाला होता. यानंतर उपस्थितांनी जखमी फारिया शेख आणि अनमता शेख यांना मेयो रुग्णालयात दाखल केले.

या घटनेतील फुगेवाल्याचे नाव मात्र समजू शकले नाही. तो रविवारी जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात फुगे विकण्यासाठी येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत फुगेवाला जखमी झाला नसल्याचे देखील सांगितले जात आहे.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे