महाराष्ट्र

Video : भूशी डॅमजवळील धबधब्यात अख्खं कुटुंब गेलं वाहून, लोणावळ्यातील धक्कादायक घटना

लोणावळ्याच्या प्रसिद्ध भूशी डॅमनजीक सहलीसाठी गेलेले अख्खं कुटुंबच धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Suraj Sakunde

लोणावळा: लोणावळ्याच्या प्रसिद्ध भूशी डॅमनजीक सहलीसाठी गेलेले अख्खं कुटुंबच धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील पाच जणांपैकी एका महिलेचा आणि दोन मुलींचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल होतोय.

दरवर्षी पावसाळ्यामध्ये लोणावळ्यातील भूशी डॅम पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. निसर्गाचा आनंद घेण्याच्या नादात अनेकदा लोक निष्काळजीपणानं वागतात. यामुळंच या परिसरात अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळं भूशी डॅम पहिल्यांदाच ओव्हर फ्लो झाला आहे. आज रविवार असल्यानं अनेक पर्यटक इथं आले होते. वानवडीतील सय्यदनगर परिसरात राहणारे अन्सारी फॅमिली फिरण्यासाठी येथे आले होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल पाहण्यासाठी अन्सारी कुटुंब गेले होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने अख्खं अन्सारी कुटूंब वाहून गेलं. बचाव पथकाने घेतला असताना एका महिलेचा आणि दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. बेपत्ता असलेल्या तीन मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव साहिस्ता नियकत अन्सारी ( वय 36) , अमिमा आदिल अन्सारी ( वय 13) आणि उमेश आदिल अन्सारी ( वय 8 ) असे आहे. तर बेपत्ता असलेल्या मुलांची नावे अदनान संभाहर अन्सारी ( वय 4 ) आणि मारिया अकील अन्सारी सय्यद ( वय 9) अशी आहेत. अंधारामुळे शोध कार्य थांबवण्यात आले आहे.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!

अर्धनग्न, मुंडन करत आंदोलनकर्त्यांचा निषेध; डुप्लिकेट जरांगे-पाटील आले चर्चेत

राज्यघटनेत दुरुस्ती केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल - शरद पवार