महाराष्ट्र

SSC - HSC EXAM : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्या दहावी--बारावी परीक्षेच्या तारखा

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम नियोजनाच्या उद्देशाने फेब्रुवारी मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. 12 वी ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे, तर लेखी 10 वी ची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वी आणि 10वीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. हे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम नियोजनाच्या उद्देशाने फेब्रुवारी मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनी छापील स्वरूपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखा निश्चित कराव्यात आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहावे. इतर कोणत्याही संकेतस्थळावर किंवा प्रणालीवर छापलेले वेळापत्रक तसेच व्हॉट्सअॅप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल केलेले वेळापत्रक स्वीकारू नये, अशी विनंती मंडळाकडून करण्यात आली आहे.

तसेच प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी बोर्डाकडून स्वतंत्रपणे कळवले जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना योग्य नियोजन करता यावे यासाठी मंडळाने दिवाळीपूर्वी संभाव्य वेळापत्रकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?