महाराष्ट्र

मराठा सर्वेक्षणात जुंपले, पण मोबदला गुलदस्त्यात; आरोग्य सेविकांमध्ये नाराजी

Swapnil S

मुंबई : मराठा सर्वेक्षणाचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे. तर दुसरीकडे सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य सेविकांना (सीएचव्ही) सर्वेक्षणाचा नेमका मोबदला किती देणार, यावरून पालिका प्रशासनाने घूमजाव केल्याचा आरोप आरोग्य सेविकांनी केला आहे. दरम्यान, आरोग्य सेविकांना किती मोबदला देणार, मोबदला देण्याची जबाबदारी कोणाची, अनेक सीएचव्ही अशिक्षित असून मोबाईल चालवण्याचे ज्ञान नाही, त्यामुळे त्यांना मोबाईल व प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांना दिल्याचे महापालिका आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड प्रकाश देवदास यांनी सांगितले.

मराठा सर्वेक्षणाचे काम आधी पालिकेच्या अभियंत्यांना देण्याचे निश्चित झाले. मात्र आता घाईघाईने सर्वेक्षणाचे काम आरोग्य सेविकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सेविका या पालिकेच्या कर्मचारी असून त्या नकार देऊ शकत नाही. तर दुसरीकडे पालिकाच म्हणते आरोग्य सेविका पालिकेच्या कर्मचारी नसल्याने त्यांना प्रसूती रजा लागू होत नाही. तसेच सर्वेक्षण करणाऱ्या सीएचव्हींना १० हजार रुपये व प्रशिक्षणाचे ५०० रुपये मोबदला देण्यात येईल असा जीआर काढला. मात्र आता प्रत्येक घरामागे १० रुपये आणि प्रशिक्षणाचे पैसे मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्वेक्षणासाठी मोबाईल व पॉवर बँक आपल्या पैशाने खरेदी करा, असेही सांगण्यात आल्याचे देवदास यांनी सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस