महाराष्ट्र

साध्वी प्रज्ञासिंग आजारी; मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने अहवाल सादर केला

बॉम्बस्फोट खटल्यात सध्या आरोपींचे जबाब नोंदवले जात आहेत. मात्र मुख्य आरोपी असूनही साध्वी प्रज्ञासिंग वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावले होते. मात्र तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगून त्यांनी वॉरंट रद्द करुन घेतले होते. न्यायालयाने सक्त आदेश दिल्यानंतरही साध्वी प्रज्ञासिंग गैरहजर राहत आहेत.

Swapnil S

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा वैद्यकीय अहवाल अखेर विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. प्रज्ञासिंग आजारी असून त्यांना तूर्त आरामाची गरज असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. याची दखल घेत विशेष न्यायाधीशांनी प्रज्ञासिंग यांना २० एप्रिलपासून सुनावणीला हजर राहावेच लागेल, अशी तंबी देत सुनावणी तहकूब ठेवली.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर बाहेर आहेत. हा खटला मुंबईतील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर नियमित सुरू आहे.

बॉम्बस्फोट खटल्यात सध्या आरोपींचे जबाब नोंदवले जात आहेत. मात्र मुख्य आरोपी असूनही साध्वी प्रज्ञासिंग वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावले होते. मात्र तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगून त्यांनी वॉरंट रद्द करुन घेतले होते. न्यायालयाने सक्त आदेश दिल्यानंतरही साध्वी प्रज्ञासिंग गैरहजर राहत आहेत. परिणामी, खटल्याला दिरंगाई होत आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने एनआयएला साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रकृतीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एनआयएने सोमवारी अहवाल सादर केला.

राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना FDA चे आदेश

Nagpur : इंस्टाग्रामवर मैत्री, 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्... १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अत्याचार, ठाण्याच्या तरुणाला अटक

नालासोपारा-वसईदरम्यान लोकलसमोर उभा राहिला माथेफिरू; संतप्त प्रवाशाने कानशिलात लगावत हटवलं, पाहा Video

बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार; विद्यार्थ्याविरुद्ध होणार कारवाई, CET कक्षाचा निर्णय

Mumbai : बेस्टच्या ताफ्यात १,५०० नव्या बसेस; BEST समितीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी