महाराष्ट्र

कराड,साताऱ्यात उच्च तापमानाची नोंद

एप्रिल महिन्याच्या मध्यान्हानंतर सूर्याच्या भीषण उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. वाढलेल्या उष्णतेत काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे.

Swapnil S

कराड : सातारा जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, कराड, सातारा शहरांसह जिल्हाभरात बुधवारी उष्णतेचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या वरती गेला होता. जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून या वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.

एप्रिल महिन्याच्या मध्यान्हानंतर सूर्याच्या भीषण उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. वाढलेल्या उष्णतेत काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे.जिल्ह्यातील दुपारचे तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत प्रमुख शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढलेला उकाडा,त्यातून निर्माण होणारे आजारामुळे नागरिकांचे लाही लाही होत आहे. वाढलेल्या तापमानाचा लहान मुले,ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

सातारा जिल्ह्यात मार्च महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ३९ अंशावर पारा पोहचला होता.दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भाग दुष्काळी माण, खटाव,फलटण,कोरेगाव या तालुक्यात पारा वाढलेला आहे. कमाल तापमान ४१ अंशापर्यंत पोहचले आहे.कराडमध्येही कमाल तापमानाचा पारा ४१ अंशापर्यंत पोहचल्यामुळे नागरिकांना किमान दुपारच्या वेळेत तरी घरात बसण्याची वेळ आली आहे तर शेतकरी सकाळ-संध्याकाळच्या सुमारास शेतातील कामे उरकून घेत आहेत

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल