PM
महाराष्ट्र

राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही! ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची तीव्र प्रतिक्रिया

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारने मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे संतप्त झाले आहेत.

ते म्हणाले की, “या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्ही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे आमचे गाऱ्हाणे मांडणार आहोत. हे सरकार मागसवर्गीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला लावावे, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत.”

ओबीसी नेते म्हणाले, छगन भुजबळ हे राज्य सरकारमध्ये ओबीसींच्या बाजूने लढत आहेत. परंतु, त्यांना कोणाचीही साथ मिळत नाही. त्यांच्या पक्षातला एकही नेता मनोज जरांगेंच्या विरोधात बोलत नाही. तसेच भाजपा नेतेही शांत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील गप्प बसलेत, फडणवीसही गप्प आहेत. आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची वेळ मागितली होती. परंतु, मागच्या वेळी ते आम्हाला भेटले नाहीत. आता पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची मागणी आहे.

शेंडगे म्हणाले, आम्हाला ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी राजकीय लढाई लढावी लागेल. आम्ही रस्त्यावरची लढणारच आहोत. महाराष्ट्रभर आक्रोश आंदोलन करणार आहोत. तसेच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या सर्व आदेशांची आम्ही होळी करणार आहोत. यासह आम्ही न्यायालयीन लढाईदेखील लढणार आहोत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त