महाराष्ट्र

प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल आला रे...थोड्याच वेळात...

नवशक्ती Web Desk

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांना इयत्ता दहावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. आता विद्यार्थ्यांना यासाठी जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेत शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल. तसंच राज्याचा एकूण लागलेला निकाल, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनी, परिमंडळ निहाय निकाल, या सर्व बाबींची माहिती शिक्षण विभागाकडून दिली जाणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

राज्यभरातून 15,77,256 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. मागच्या आठवड्यात शिक्षण विभागाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर दहावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दहावी हे निर्णायक वर्ष असल्याने या वर्गाला खूप महत्व आहे. त्यामुळे आतूरतेनं दहावीच्या निकालाची वाट पाहीली जात होती. शिक्षण विभागाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT या लिंकवर क्लिक करुन SSC Examination February- 2023 RESULT या लिंकवर क्लिक करा. यानंतर पुढचं पेज ओपन झाल्यानंतर त्यावर Seat Number आणि आईचं नाव टाका. यानंतर निकाल स्क्रिनवर दिसेल.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल