महाराष्ट्र

सांगलीत कृष्णा नदीत कार कोसळून तिघांचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

कृष्णा नदीत चार चाकी कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Swapnil S

सांगली : कृष्णा नदीत चार चाकी कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूरहून सांगलीकडे जाणारी ही चारचाकी कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातात प्रसाद भालचंद्र खेडेकर (३५) व त्यांची पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर (३६) व वैष्णवी संतोष नार्वेकर (२१) यांचा मृत्यू झाला, तर समरजीत प्रसाद खेडेकर (७), वरद संतोष नार्वेकर (१९) व साक्षी संतोष नार्वेकर (४२) हे जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर अपघातातील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट