महाराष्ट्र

टायगर अभी जिंदा है…! एकनाथ खडसेंच्या जाहिरातीमुळे चर्चेला उधाण

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची मोठ्या प्रमाणावर झालेली पिछेहाट, त्यातून मतदारांपर्यंत गेलेला मेसेज, राज्याचे भाजपचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांना आलेले अपयश आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची केलेली घोषणा यामुळे...

Swapnil S

विजय पाठक/ जळगाव

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची मोठ्या प्रमाणावर झालेली पिछेहाट, त्यातून मतदारांपर्यंत गेलेला मेसेज, राज्याचे भाजपचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांना आलेले अपयश आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची केलेली घोषणा यामुळे भाजप चांगलाच ढवळून निघाला असताना गुरुवारी एकनाथराव खडसे मित्रपरिवाराने येथील दैनिकात एक जाहिरात एकनाथ खडसे यांच्या फोटोसह प्रसिद्ध करून

मै आज भी इतिहास बदल सकता हू,

इतना भी कमजोर ना समझो मुझको,

टायगर अभी जिंदा है...!

असा संदेश देत घायाळ भाजपला वाचवण्यासाठी खडसे येत असल्याचा संदेश देत प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

भाजपमध्ये चाळीस वर्षे राहून जळगाव जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात एकनाथ खडसेंचा मोठा हातभार आहे. २०१४ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील सहा जागा भाजपला मिळवून देण्यात खडसेंचा मोठा वाटा होता. भाजपचे संघटन उभारण्यात गोपीनाथ मुंढे पाठोपाठ खडसेंचे नाव घेतले जात होते. विरोधी पक्षनेते पदानंतर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, असे वाटत असतांना ते देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आणि खडसेंच्या नाराजीची ठिणगी पडली. नंतर नाराजीबरोबर खडसे-फडणवीस यांच्यातील दरी देखील वाढत गेली. अखेर खडसेंनी नाराजीतून पक्ष सोडला, त्यानंतर दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. खडसे कितीही नाराज असले तरी त्यांचे भाजप प्रेम कायम असल्याचे चित्र पहावयास मिळाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसेंनी आपण भाजपमध्ये परतणार असल्याचे दिल्लीत जाहीर केले. निवडणुकीपूर्वी त्यांचे आगमन होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र महाराष्ट्रातून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना त्यांनी आपल्या सुनेला रक्षा खडसेला पूर्ण पाठिंबा दिला. रक्षा खडसेंना रावेर मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर खडसेंनी प्रवेशाची वाट न पाहता त्यांना मार्गदर्शन व सहाय्य केल्याने रक्षा खडसेंचा विजयी मार्ग सोपा झाला.

जनतेने भाजपला नव्हे, तर चुकीच्या नेतृत्वाला झुगारले

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची उडालेली दाणादाण, त्यातून गेलेला मेसेज, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची केलेली घोषणा यामुळे भाजप चांगलाच ढवळून निघाला असून आज परत संघटन बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. संघटनेत जीव ओतून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजपला गरज आहे, असे सांगत मी म्हणजे संघटना असे म्हणणाऱ्या नेत्यांचा सर्वत्र सुळसुळाट झाला असून या निवडणुकीत जनतेने भाजपला नव्हे तर चुकीच्या नेतृत्वाला झुगारले असल्याची भावना खडसे यांनी व्यक्त केली. मै आज भी इतिहास बदल सकता हू, इतना भी कमजोर ना समझो मुझको असे सांगत आजही भाजप संघटनेत काम करून भाजपला महाराष्ट्रात पूर्वीचे दिवस आणून देण्याची इच्छा खडसे यांनी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा