महाराष्ट्र

राज्य पोलीस दलातील १८ उपायुक्तांच्या बदल्या; अकबर पठाण यांची अभियान, दत्ता नलावडे-विशाल ठाकूर गुन्हे शाखेत

अमली पदार्थविरोधी पथक, सशस्त्र पोलीस ताडदेव विभागाचे उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांची दक्षिण वाहतूक विभाग म्हणून नियुक्ती झाली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य पोलीस दलातील १८ पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरा गृहविभागाकडून १८ पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यात परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची अभियान, परिमंडळ नऊचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ तीन, परिमंडळ-१०चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

परभणी पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांची अंमलबजावणी गुन्हे शाखा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त समाधान पवार यांची मध्य विभाग-वाहतूक विभाग, ठाण्याचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांची ताडदेव दोन सशस्त्र विभाग, पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक यांची पश्‍चिम उपनगर वाहतूक विभाग, अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दत्तात्र बापू कांबळे यांची विशेष शाखा एक, पुणे ग्रामीण बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांची परिमंडळ अकरा, नागपूर लोहमार्ग विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांची वरळी सशस्त्र पोलीस तीनमध्ये बदली करण्यात आली आहे.

मुख्यालय दोनच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची परिमंडळ पाच, विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांची परिमंडळ दहा, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांची परिमंडळ नऊ, संरक्षण विभागाचे उपायुक्त महेश चिमटे यांची मुख्यालय एक, अभियान विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची गुन्हे शाखा एक, सुरक्षा विभागाचे उपायुक्त शाम घुगे यांची अमली पदार्थविरोधी पथक, सशस्त्र पोलीस ताडदेव विभागाचे उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांची दक्षिण वाहतूक विभाग म्हणून नियुक्ती झाली आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर

मुंबई-गोवा महामार्गाला ग्रामस्थांकडून हिरवाईची भेट; तळेकांटे ग्रामस्थ लावणार दोन हजार झाडे

भारतात ४८ अब्ज डॉलर गुंतवणुकीची ॲमेझॉनची घोषणा; सीईओ अँडी जॅसी यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

Badlapur : प्राजक्ता मेहेर यांची हत्या केल्याचे स्पष्ट; फॉरेन्सिक अहवालातून हत्येचा उलगडा