Photo : X
महाराष्ट्र

Nashik : त्र्यंबकला परराज्यातील भाविकांचा गोंधळ; मंदिराच्या दारावर लाथा मारत हुल्लडबाजी, सुरक्षारक्षकांकडून चोप

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे दर्शन रांगेचा दरवाजा बंद करण्यात आला होता. याचा राग येऊन परराज्यातील काही भाविकांनी मंदिर परिसरात संतापजनक गोंधळ घातला. बंद दारावर लाथा मारत त्यांनी हुल्लडबाजी केली. सुरक्षारक्षक आणि इतर भाविकांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते न ऐकल्याने अखेर सुरक्षारक्षकांनी त्यांना चांगलाच चोप दिला.

Swapnil S

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे दर्शन रांगेचा दरवाजा बंद करण्यात आला होता. याचा राग येऊन परराज्यातील काही भाविकांनी मंदिर परिसरात संतापजनक गोंधळ घातला. बंद दारावर लाथा मारत त्यांनी हुल्लडबाजी केली. सुरक्षारक्षक आणि इतर भाविकांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते न ऐकल्याने अखेर सुरक्षारक्षकांनी त्यांना चांगलाच चोप दिला.

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात राज्याबाहेरील भाविकांसह मोठी गर्दी होत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या गोंधळामुळे इतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. गोंधळ करणाऱ्या भाविकांविरोधात कारवाईची मागणीही करण्यात आली.

या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला मंदिर सुरक्षारक्षकांवर भाविकांना मारहाण केल्याचा आरोप झाला. मात्र मंदिर प्रशासनाने बंद दारावर लाथा मारतानाचे आणि हुल्लडबाजी करतानाचे व्हिडीओ सार्वजनिक केले. त्यामुळे खरा प्रकार उघडकीस आला आणि सुरक्षारक्षकांवरील गैरसमज दूर झाला.

दरम्यान, पोलिसांनी गोंधळ करणाऱ्या भाविकांना समज दिल्यानंतर हे प्रकरण निवळले. संबंधित भाविकांच्या कुटुंबीयांनी मंदिर प्रशासनाची माफी मागितल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान