Nashik : दर्शनासाठी तीन हजार घेणे पडले महागात; त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्ताला अटक 
महाराष्ट्र

Nashik : दर्शनासाठी तीन हजार घेणे पडले महागात; त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्ताला अटक

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या एका विश्वस्ताला मंगळवारी अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच, काही अज्ञात ‘दलालांनी’ काही भाविकांकडून पावती न देताच, ‘व्हीआयपी’ सुविधेद्वारे देवतेचे त्वरित दर्शन घडवून आणण्याच्या बहाण्याने प्रत्येकी ३ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Swapnil S

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या एका विश्वस्ताला मंगळवारी अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच, काही अज्ञात ‘दलालांनी’ काही भाविकांकडून पावती न देताच, ‘व्हीआयपी’ सुविधेद्वारे देवतेचे त्वरित दर्शन घडवून आणण्याच्या बहाण्याने प्रत्येकी ३ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना पहाटे १ वाजता अटक करण्यात आली. ही कारवाई पुराव्यांवर आधारित आहे. आम्ही आतापर्यंत दोन व्यक्तींना अटक केली आहे. आणखी काही नावे समोर आली आहेत आणि त्यांची

शहानिशा केल्यानंतर त्यांनाही लवकरच अटक केली जाईल," असे पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

आरोपीला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरात नाशिक येथील दोन भाविकांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडे २०० रुपयांचे ‘दर्शन पास’ असूनही, एका संशयिताने त्यांना १० मिनिटांत ‘व्हीआयपी’ दर्शन घडवून आणण्याच्या बहाण्याने ३ हजार रुपये देण्यास राजी केले. आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराने त्यांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला, परंतु त्यांना कोणतीही पावती दिली नाही.

पोलिसांनी विविध कलमांखाली गोतीराम मनाजी पेहर आणि अटक करण्यात आलेल्या विश्वस्ताचा पुतण्या अभिषेक कडलग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पेहर याला अटक करण्यात आली असून, कडलग मात्र अद्याप फरार आहे.

अभिषेकच्या चौकशीदरम्यान पुरुषोत्तम कडलग यांचा या प्रकरणात कथित सहभाग असल्याचे समोर आले, असे पोलिसांनी सांगितले. काही दलाल मंदिराच्या परिसरातच वावरत असत आणि ज्या भाविकांना त्वरित दर्शन हवे असते, त्यांना ते लक्ष्य करत असत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

दलालांचा सुळसुळाट

हे दलाल अशा भाविकांना पावती न देताच ‘व्हीआयपी दर्शन’ घडवून आणण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे देण्यास राजी करत असत. ते ‘ग्रुप बुकिंग’ची सुविधाही उपलब्ध करून देत असत आणि त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असत, असे पोलिसांनी नमूद केले.

सोशल मीडियावरील बनावट मजकुराला बसणार आळा; 'क्विक रिस्पॉन्स टीम'ची सरकारकडून स्थापना

सुपारी आयातीत २,५०० कोटींचा घोटाळा; महसूल गुप्तवार्ताकडून अखेर पर्दाफाश

अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

Mumbai Local Train Update : कल्याण-बदलापूर मार्गिका २०२८ मध्ये; बोरिवली-विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम ३०% पूर्ण

Pune : चाकणच्या समस्यांबाबत सरकार ॲक्शन मोडवर; रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापनाला प्राधान्य