महाराष्ट्र

रायगडावरून उदयनराजेंची मोठी घोषणा, भाजपच्या नेत्यांना सुनावत केली 'ही' घोषणा

कोणत्याही प्रकारे राजकारण येऊ देऊ नका. यामागे कोणताही स्वार्थ नाही, शिवाजी महाराजांबद्दल बद्दल कोणी तरी तिरस्कार दाखवावा. मग काय घडते ते बघाच

प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि अन्य काही भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या विधानांना विरोध करत विरोधकांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवण्याची मागणी केली आहे. आज रायगडावरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी यासंदर्भात भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. ‘त्यांना हे सांगताना लाज वाटली पाहिजे’, असे म्हणत उदयनराजांनी राज्यपाल आणि भाजपच्या संबंधित नेत्यांवर टीका केली. महाराजांचा जयजयकार करायला आलो असतो तर वेगळाच आनंद झाला असता. पण आपण काय करत आहोत? 

काय म्हणाले उदयनराजे ?

आपण सर्वांनी लवकरच तारीख ठरवून मुंबईच्या आझाद मैदानात जायचे आहे. आजचा दिवस इतिहासात लिहिण्याचा दिवस आहे. कारण आज आपण निर्णय घेतला आहे. आपल्या सर्वांची अस्मिता असलेल्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखा. आज आपण सर्वजण इतिहासाचा एक भाग झालो आहोत. त्यात कोणत्याही प्रकारे राजकारण येऊ देऊ नका. यामागे कोणताही स्वार्थ नाही, शिवाजी महाराजांबद्दल बद्दल कोणी तरी तिरस्कार दाखवावा. मग काय घडते ते बघाच...

"आज महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अनादर होत आहे. चित्रपट असो, लेखन असो, विधान असो.. आपण सगळे ते शांतपणे ऐकतो. काही जण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ काढतात. त्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन करण्याचे धाडस काही जण करतात. महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही. अशा विधानांना पुष्टी मिळते आणि आपण सगळे बघत बसतो. आतापर्यंत आपण सर्वांनी केलेली ही सर्वात मोठी चूक आहे. आता प्रतिक्रिया देऊन आपण सगळेच प्रतिक्रिया देणारे झालो आहोत. आम्हाला या सगळ्याची सवय झाली आहे. हे या देशासाठी धोकादायक आहे, असे उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार