महाराष्ट्र

"खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही", उद्धव ठाकरे शिंदे गटावर बरसले

Rakesh Mali

"भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही. खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही", असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. उल्हासनगर येथील राजेश वानखेडे यांनी आज शेकडो सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन हाती बांधले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे शिंदे गटावर चांगलेच बरसले.

पक्षप्रवेश करताना, राजेश वानखेडे यांनी "आज आपल्या घरात आल्यासारखे वाटते", अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही फार महत्वाच्या शब्दांमध्ये भावना मांडल्या. पण, काही जण बाहेर भटकंतीला गेले आहेत. त्यांना परत घरात घेणार नाही. कारण जे खोक्यात बंद झालेत त्यांना पुन्हा खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही." यावेळी शिवसैनिकांनी '50 खोके एकदम ओके', अशा घोषणा दिल्या.

नाशिकला येण्य़ाचे आवाहन-

आमच्याकडे शिवसैनिकांची माया, प्रेम, जिद्द, हिम्मत आहे. तुम्ही परत आलात तुमचे स्वागत आहे. लढाई फार मोठी आहे. आपल्यासमोर खोकेवाले आहेत. एवढे खोके घेऊनही घटनाबाह्य सरकारला उठता बसता मीच दिसतो. 23 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात कार्यक्रम जाहीर केला आहे. काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहोत. 23 तारखेला नाशिकला सर्वांनी या, असे आवाहनही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

तिन्ही निडणुका एकत्र घ्या-

यावेळी ठाकरे यांनी विरोधी पक्षाला निवडणुका घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तुम्ही तिन्ही निवडणुका घ्या. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणूका एकत्र लावा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय आहे ते कळेल. लवकरच राम राज्य येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल