महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; भगवा सप्ताहनिमित्त ठाकरे गटाचा मेळावा

आपल्या भाषणातून आक्रमक भूमिका मांडणारे व विरोधकांवर सडकून टीका करणारे उद्धव ठाकरे यांची मुलुखमैदान तोफ शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे.

Swapnil S

मुंबई : आपल्या भाषणातून आक्रमक भूमिका मांडणारे व विरोधकांवर सडकून टीका करणारे उद्धव ठाकरे यांची मुलुखमैदान तोफ शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या शिव संकल्प मेळाव्यात ठाकरेंच्या निशाण्यावर कोण असणार, ते कोणाला टार्गेट करणार याकडे सत्ताधारी पक्षासह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर ‘मविआ’चे प्रमुख नेते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत. उद्धव ठाकरेही सत्ताधाऱ्यांचा कडव्या शब्दात समाचार घेत आहेत.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य