संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर; इंडिया आघाडीतील नेत्यांशी जागावाटपाची चर्चा करणार?

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Swapnil S

मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांशी ठाकरे विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाची चर्चा करणार असल्याचे समजते.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. ठाकरे यांचा हा संवाद दौरा असून ते तृणमूल काँग्रेस, सपा आणि आपच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही ठाकरे चर्चा करणार आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी येथे सांगितले.

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान