महाराष्ट्र

मराठी माणसात फूट पडू देणार नाही - उद्धव ठाकरे; मनसेसोबतच्या युतीचा पुनरुच्चार

मराठी माणसांमध्ये फूट पडू देणार नाही. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच, असे सांगतानाच, आगामी निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

Swapnil S

मुंबई : मराठी माणसांमध्ये फूट पडू देणार नाही. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच, असे सांगतानाच, आगामी निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. दादरच्या शिवतीर्थावर भर पावसात शिवसेनेचा (उबाठा) दसरा मेळावा गुरुवारी सायंकाळी पार पडला. त्याला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी. तसेच मी मुख्यमंत्री असताना कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी केली होती. तशी कर्जमाफी करावी, अन्यथा मराठवाड्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. हिंदुत्वावरून आमच्या अंगावर आल्यास तुमचे टोप्या घातलेले सर्व फोटो बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. मुंबई मनपा निवडणूक, मराठी, जीएसटी, सोनम वांगचुक आदी विषयांवर त्यांनी मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, कमळाबाईने राज्यातील जनतेच्या आयुष्याचा चिखल केल्याचे सांगतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याच्या विविध भागात अस्मानी संकट कोसळले आहे. आता ओला दुष्काळ नसल्याच्या संज्ञा नसल्याचे राज्यातील महायुती सरकार सांगत आहे. त्यामुळे निकष न लावता सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर करावे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. जिथे मराठीची गळचेपी होणार, मातृभाषेचा विषय येईल त्या ठिकाणी आम्ही सगळं विसरून एकत्र येणार. ‘आम्ही एकत्र आलो आहोत, म्हणजे एकत्र राहणारच’. मनपा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने मुंबई मनपाने केलेल्या ‘लुटी’वर श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.

वांगचुक यांच्या अटकेचा उल्लेख करताना व महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याचा संदर्भ देताना ठाकरे म्हणाले, ‘देशात हक्क व न्यायासाठी लढणे हेच देशद्रोह ठरू लागले आहे. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी लडाखच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला. पण मोदींनी त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लावला. त्यामुळे अशा कायद्यांचा दुरुपयोग केला जातो. मोदींची स्तुती करेपर्यंत वांगचूक देशभक्त होते, आता देशद्रोही कसे झाले, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

पाकिस्तानची पुन्हा पोलखोल! ऑपरेशन सिंदूरमध्ये F-16 सह ४ ते ५ लढाऊ विमाने भारताने पाडली; भारतीय हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा

पिंपरी-चिंचवड : खेळता खेळता चुकून लिफ्टमध्ये गेला अन् अडकला; ११ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

SRA चा कॉर्पस फंड १ लाख! झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; इमारतींच्या उंचीप्रमाणे रकमेत होणार वाढ

डायग्नोस्टिक लॅब्ससाठी नवीन कायदा; चाचण्यांची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी सरकारचे पाऊल

...तर ओला, उबरवर कारवाई