छाायाचित्र सौजन्य, एक्स @SumitBaneMNS
महाराष्ट्र

उद्धव - राज एकत्र! कुटुंबाच्या विवाहासाठी ठाकरे बंधुंची उपस्थिती

शिवसेनेचे (ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी मुंबईत एका विवाह समारंभाच्या निमित्ताने एकत्र आले.

Swapnil S

मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी मुंबईत एका विवाह समारंभाच्या निमित्ताने एकत्र आले.

उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे त्यांचे भाचे यश देशपांडे यांच्या विवाहात रविवारी सहकुटुंब दादरमध्ये उपस्थित राहिले.

यश हे राज ठाकरे यांची मोठी बहिणी जयवंती देशपांडे यांचे पुत्र आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या माहेरच्यांकडूनही जवळचे नातेवाईक आहेत. उद्धव व रश्मी यांची ओळख जयवंती यांच्यामुळेच झाली. व पुढे उद्धव व रश्मी यांचा विवाह झाला.

ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यादेखील या विवाह समारंभास उपस्थित होत्या.

राज ठाकरे हे गेल्या आठवड्यात रश्मी ठाकरे यांचा भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या विवाहालाही उपस्थित होते. मात्र उद्धव येण्याच्या आधीच राज हे तेथून निघून गेले होते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली