महाराष्ट्र

तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात; सूरत डायमंड बोर्सवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पत घेणाऱ्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करू नये. तर मराठा आरक्षण कसे देता येईल ते सांगावे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Swapnil S

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सूरत डायमंड बोर्स सुरु झाला आहे. त्याचा फटका मुंबईतील हिरे व्यवसायाला बसला आहे. पंतप्रधान आर्थिक राजधानी गुजरातला हलवण्याच्या मार्गावर आहेत. ते त्यांच्या भाषणात सुद्धा गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे म्हणतात. ते केवळ गुजरातचे आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात असे देखील त्यांनी पंतप्रधान मोदींना सुनावले.

शिवसेना ठाकरे गटासह इतर विरोधी पक्षांनी मिळून धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरुद्ध मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर भाजपसह शिंदे गटाने आक्षेप घेतला. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलाच धारेवर धरले. आक्षेप घेणारी मंडळी अदानींचे चमचे आहेत, असा टोला त्यांनी आज (१८ डिसेंबर ) विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

धारावी प्रकल्पाविरुद्ध काढलेल्या मोर्चातील माणसे केवळ धारावीतील नव्हती. हा मोर्चा सेटलमेंट मोर्चा होता, अशी टीका होत आहे. या टिकेला उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, "आम्ही मुंबईतून नाही तर चंद्राहून माणसे आणली. या मोर्चात फक्त भाजप नव्हती. ते असते तर सेटलमेंट झाली असती. मुंबई विकण्यासाठी काही लोक अदानींची चमचेगिरी करत आहेत." इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या दिल्ली येथे जाणार आहे. या बैठकीचा अजेंडा उद्या कळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आमदार नितेश राणेंनी सलीम कुत्ता विषय विधानसभेत मांडताच एसआयटी लावली. पण, आमच्याकडे याच कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन नाचतानाचा पुरावा आहे. हे पुरावे सभागृहात दाखवल्यानंतरही सरकार आम्हाला बोलू देत नाही. आमच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे एसआयटी लावण्यात यावी.

छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पत घेणाऱ्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करू नये. तर मराठा आरक्षण कसे देता येईल ते सांगावे. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सुवेंदू अधिकारी : ममतांचे उजवे हात ते 'भावी मुख्यमंत्री'

मुक्काम पोस्ट तमिळनाडू : वारेमाप आश्वासने पूर्ण करणे आव्हानात्मक

मुक्काम पोस्ट पश्चिम बंगाल : ममतांचा बालेकिल्ला ढासळला

मुक्काम पोस्ट केरळ : 'यूडीएफ'चे वादळ; केरळमध्ये राजकीय सत्तापालट; काँग्रेसचे पुनरागमन, भाजपचे खाते उघडले

मुक्काम पोस्ट आसाम : भाजपची पकड आणखी मजबूत