महाराष्ट्र

"त्यांनी लाडका बेटा योजना राबवली..." मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

"स्वतःच्या लेकासोबतच जनतेच्या लेकांचीसुद्धा काळजी घ्यावी," अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.

Suraj Sakunde

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज दुपारी दोन वाजता विधानसभेत सादर केला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक, वारकरी तसेच समाजातील सर्व घटकांसाठी विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज सकाळी उद्धव ठाकरेंनी विविध गोष्टींवरून सरकारवर निशाणा साधला. महिला-पुरुष भेद न करता लाडकी लेक, लाडकी बहिण प्रमाणे लाडका पुत्र, लाडका भाऊ योजनाही काढा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. स्वतःच्या लेकासोबतच जनतेच्या लेकांचीसुद्धा घ्यावी, असा खोचक टोला मुख्यंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी लगावला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आम्ही जेव्हा सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, तेव्हा तरुण, महिला, विद्यार्थी, वारकरी सगळेच त्यात येतात. आम्ही तीन सिलेंडर वर्षाला मोफत देणार आहोत. मुलांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या. लाखो विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतायत. बेरोजगारांना 10 हजार रुपयांची विद्यावेतन देत आहोत.’

ते पुढं म्हणाले की, "लाडका भाऊ योजना आम्ही केली ना, 10 हजार रुपये देत आहोत. पण यांनी तर लाडका बेटा योजना अडीच वर्ष राबवली."

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

आज सकाळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "लाडकी बहीण, लाडकी लेक ही योजना तुम्ही आणत असाल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. यानिमित्तानं एक गोष्ट मला बरी वाटली की, घराणेशाहीबद्दल बोलणारे लेकींची काळजी घेऊ लागले. लेकींची जशी काळजी घेतायत, तशी स्वतःच्या लेकासोबतच जनतेच्या लेकांचीसुद्धा घ्यावी. महिला-पुरुष असा भेदभान न करता, लाडकी बहीण, लाडकी लेक प्रमाणेच मुलांसाठीही लाडका मुलगा, लाडका भाऊ हीसुद्धा योजना त्यांनी आणावी. निवडणूकीच्या तोंडावर हा गाजर संकल्प आहे. निवडणूकीपुरती ही योजना मर्यादित राहू नये. आजही लाखो तरूणांचे लोंढे नोकरीच्या शोधात फिरत आहेत. अशा आपल्या मुलांना लाडकी लेक, लाडकी बहिण उत्तर काय देणार...त्यामुळं दोघांच्या कर्तबगारीला वाव मिळाला पाहिजे. रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत."

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी