महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचं ठरलं! अयोध्येला नाही, 22 जानेवारीला 'या' मंदिरात जाणार

Rakesh Mali

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला देशातील अनेक मान्यवरांना आमंत्रित केले गेले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे अद्यापही आमंत्रण आलेले नाही. या आमंत्रणावरुन अनेक ना्टयमय घडामोडी घडल्या. आता उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्प्ष्ट केली. "२२ जानेवारी रोजी आपण नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता", असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

आज मीनाताई ठाकरे यांची जयंती, या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे सपत्निक आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो."

प्रभू राम वनवासात पंचवटीत होते. हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन संध्याकाळी साडेसातला गोदा आरती करणार आहोत. त्यानंतर 23 जानेवारीला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने नाशिकला शिवसेनेचे अधिवेशन होईल. संध्याकाळी गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा घेणार घेतली जाईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण हे केवळ रामभक्तांनाच मिळणार असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले होते. भाजपच्या अनेक नेत्यांकडूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस