राज ठाकरे  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

'बिनविरोध' पॅटर्नवरून बोंबाबोंब; विरोधकांनी उठवला आवाज; राज ठाकरेंचे पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ'

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सुरू असलेल्या 'बिनविरोध' निवडून येण्याचा पॅटर्न लोकशाहीसाठी घातक असून विरोधकांनी एकत्र येत आवाज उठवायला सुरू केली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या ७० उमेदवारांची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सुरू असलेल्या 'बिनविरोध' निवडून येण्याचा पॅटर्न लोकशाहीसाठी घातक असून विरोधकांनी एकत्र येत आवाज उठवायला सुरू केली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या ७० उमेदवारांची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये, सर्वाधिक उमेदवार हे भाजपचेच उमेदवारांना आहेत. दबाव तंत्र, पैशांचे आमिष दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे ठाण्यात मनसेच्या एका उमेदवारानेही निवडणुकीतून माघार घेतल्याने मनसैनिकांना हा मोठा धक्का होता, त्यामुळे बिनविरोध झालेले हे उमेदवार कसे निवडून आले आहेत? याची पोलखोल येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे करणार आहेत.

मनसे बिनविरोधप्रकरणी उद्या जाणार कोर्टात राज ठाकरे आगामी प्रचार सभांमधून कॉल रेकॉर्ड आणि व्हिडीओच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत. कारण, राज ठाकरे यांच्याकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलतील नेत्यांनी हे पुरावे सुपूर्द केले असल्याची माहिती आहे. तसेच, महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या प्रकरणी राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आक्रमक झाली आहे. या सगळ्याप्रकरणी येत्या सोमवारी मनसे बिनविरोध उमेदवार आणि त्यांच्या जागांबाबत कोर्टात जाणार आहे. तसेच सोमवारी या सगळ्या प्रकरणी मनसेचे प्रमुख नेते राज्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेणार आहेत.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल