महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीच्या सासू आणि नवऱ्याच्या अडचणीत वाढ; जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी अटकेला परवानगी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील संशयित म्हणून चर्चेत असलेला वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि त्यांची आई लता हगवणे यांना जेसीबी विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Swapnil S

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील संशयित म्हणून चर्चेत असलेला वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि त्यांची आई लता हगवणे यांना जेसीबी विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता, ज्यावर आज (२ मे, सोमवार) सुनावणी झाली. न्यायालयाने या आई-लेकाला अटक करण्याची परवानगी दिली असून, आता पोलीस त्यांचा ताबा येरवडा तुरुंगातून घेणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निगोजे गावचे रहिवासी प्रशांत येळवंडे यांनी हगवणे आई-लेकावर जेसीबी विक्रीत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. येळवंडे यांनी मार्च २०२२ पासून जेसीबीच्या ऍडव्हान्स आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी लता हगवणेंच्या खात्यावर एकूण ११ लाख ७० हजार रुपये पाठवल्याचे म्हटले आहे. मात्र, काही महिन्यांतच बँकेने जेसीबी परत ताब्यात घेतली.

या फसवणूक प्रकरणात प्रशांत येळवंडे यांनी मे २०२४ मध्ये तक्रार दिली होती. त्यावेळी पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी हस्तक्षेप केल्याने कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप येळवंडे यांनी केला आहे. येळवंडे यांच्या म्हणण्यानुसार, शशांक आणि लता हगवणेंनी त्यांची ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवून कुटुंब संपवण्याची धमकी दिली. 'माझा मामा मोठा अधिकारी आहे, माझ्यावर कारवाई करण्याची हिंमत कोणात नाही,' असे म्हणत शशांकने धमकावल्याचेही येळवंडे सांगतात.

वैष्णवीच्या प्रकरणानंतर मात्र पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी प्रशांत येळवंडे यांचा फसवणूक गुन्हा दाखल करून घेतला, जेसीबी ताब्यात घेतली. आणि आता न्यायालयाच्या परवानगीने, येरवडा तुरुंगात असलेल्या शशांक आणि लता हगवणे यांना मंगळवारी ३ जूनला म्हाळुंगे पोलीस अटक करणार आहेत.

कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - सुप्रीम कोर्ट; हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार

अमेरिकेच्या भूमीवरून मुनीर यांनी ओकली गरळ; भारताला अणुहल्ल्याची धमकी

ही पाकिस्तानची जुनीच खोड! अणुहल्ल्याच्या धमकीला भारताचे सडेतोड उत्तर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी; महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

महायुतीत पुन्हा कलगीतुरा रंगणार? नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरे करणार ध्वजारोहण