महाराष्ट्र

वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार

भारतात लैंगिक समतेसाठी कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘पॉप्युलेशन ॲवार्ड’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दैनिक ‘नवशक्ति’मध्ये त्या विविध सामाजिक विषयावर स्तंभलेखन करीत आहेत.

Swapnil S

न्यूयॉर्क : भारतात लैंगिक समतेसाठी कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘पॉप्युलेशन ॲवार्ड’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दैनिक ‘नवशक्ति’मध्ये त्या विविध सामाजिक विषयावर स्तंभलेखन करीत आहेत.

मागील ३५ वर्षांहून अधिक काळ महिलांवरील अत्याचार, लिंगभेद आणि सामाजिक अन्याय याविरुद्ध लढा देणाऱ्या एक अग्रगण्य कार्यकर्त्या म्हणून वर्षा देशपांडे ओळखल्या जात आहेत. त्यांनी १९९०मध्ये दलित महिला विकास मंडळाची स्थापना केली. त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, आवश्यक सेवा व संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याच्या कार्यात सातत्याने योगदान देत आहेत.

लिंगाधारित गर्भ निवडीविरोधात त्यांनी कायद्यामधील सुधारणा, सामुदायिक संवाद आणि जनजागृतीच्या माध्यमातून व्यवहारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बालविवाह रोखण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या सशक्तीकरणाबरोबरच पुरुष व मुलग्यांमध्ये जागृती घडवण्यासाठीचे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत. असंघटित क्षेत्रातील महिलांचे हक्क सुरक्षित करणारे आणि संयुक्त मालमत्ता नोंदणीसाठी प्रेरणा देणारे कार्यक्रमही त्यांनी सुरू केले आहेत.

त्या पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act) स्थापन करण्यात आलेल्या विविध अधिकृत समित्यांच्या सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी बनवण्यास त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

हा कार्यकर्त्यांचा सन्मान!

या पुरस्काराविषयी आपल्या भावना व्यक्त करताना वर्षा देशपांडे म्हणाल्या, ‘लिंगाधारित गर्भ निवड आणि घटणारे लिंग गुणोत्तर याविरुद्ध मी जो संघर्ष केला त्यासाठी मला ही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर जे समुदायांशी संवाद साधून परिवर्तन घडवतात त्या हजारो कार्यकर्त्यांसाठी आहे.

संवेदनशील विषयावरील कार्याची नोंद

यूएनएफपीए भारताच्या प्रतिनिधी व भूतानच्या देश संचालक अँड्रिया एम. वोज्नार म्हणाल्या, ‘वर्षा देशपांडे यांनी जात, धर्म आणि लिंग यावर आधारित भेदभावाविरुद्ध लढत समतामूल्य समाज निर्माण करण्यासाठी केलेले काम अत्यंत प्रशंसनीय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक स्त्रियांना प्रतिष्ठेचे, संधीचे आणि आरोग्यपूर्ण जीवन जगता आले आहे. मी त्यांच्या धैर्याचे आणि संवेदनशील विषयांवर कार्य करण्याच्या जिद्दीचे मन:पूर्वक कौतुक करते.’

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत