ज्येष्ठ टाळवादक टाकळकर यांचे निधन  
महाराष्ट्र

ज्येष्ठ टाळवादक टाकळकर यांचे निधन

अभिजात संगीताच्या मैफलीत अभंग आणि भजन गायनाच्या वेळी गायकाच्या सुरांमध्ये आपल्या टाळवादनाने रंग भरणारे ज्येष्ठ टाळवादक ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर (वय ९९) यांचे अल्पशा आजाराने रविवारी खासगी रुग्णालयात निधन झाले.

Swapnil S

पुणे : अभिजात संगीताच्या मैफलीत अभंग आणि भजन गायनाच्या वेळी गायकाच्या सुरांमध्ये आपल्या टाळवादनाने रंग भरणारे ज्येष्ठ टाळवादक ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर (वय ९९) यांचे अल्पशा आजाराने रविवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.गेल्याच महिन्यात माउलींनी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त अखिल मंडई मंडळाच्या वतीने धान्यतुला आणि ग्रंथतुला करून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात माऊलींवर प्रेम करणाऱ्या संगीत रसिकांसह वारकरी संप्रदायातील अनेकांनी हजेरी लावली होती. अखेरपर्यंत ठणठणीत असलेल्या माउलींना आठ दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

माउली टाकळकर यांचा जन्म ११ एप्रिल १९२७ रोजी झाला. कलाकारांच्या चार पिढ्यांना सातत्याने लयबद्ध टाळवादनाची साथ करणाऱ्या माऊलींची प्रत्येक टाळसाथ ही लयबद्ध आणि भक्तिरंग निर्माण करणारी असायची. माधवबुवा सुकाळे यांच्याकडे त्यांनी जवळपास १० वर्षे टाळवादनाचे शिक्षण घेतले, पुढे ते पखवाज वादन शिकले, पण ते खऱ्या अर्थाने रमले ते टाळ वादन करण्यात. माऊली टाकळकर यांचा जन्म ११ एप्रिल १९२७ रोजी झाला.

कलाकारांच्या चार पिढ्यांना सातत्याने लयबद्ध टाळसाथ करणाऱ्या माऊली टाकळकर यांची प्रत्येक टाळसाथ ही लयबद्ध आणि भक्तिरंग निर्माण करणारी असायची. माऊली टाकळकर यांनी माधवबुवा सुकाळे यांच्याकडे जवळपास १० वर्षे टाळवादनाचे शिक्षण घेतले, पुढे ते पखवाज वादन शिकले, पण ते खऱ्या अर्थाने रमले ते टाळ वादन करण्यात. संगीत रंगभूमीवरचे नसटम्राट बालगंधर्व यांच्यापासून स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी अशा तीन पिढ्यांना त्यांनी टाळवादनाची संथसंगत केली. पं. भीमसेन जोशी यांना चार दशकांहून अधिककाळ टाळवादनाची साथ करणाऱ्या माउलींनी पं. भीमसेन जोशी यांच्यासमवेत एकमेव पाकिस्तानचा अपवाद वगळता जगभरातील बहुतांश देशांमध्ये दौरे केले.

जोशी यांच्या ‘संतवाणी’च्या अडीच हजारांहून अधिक कार्यक्रमात माउलींनी त्यांना साथसंगत केली होती. त्यांना माउली यांचा अपूर्व उत्साह, तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा सर्वांनाच अचंबित करणारी होती. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात कलाकाराइतकेच टाळ्यांच्या कडकडाटात माउलींचे स्वरमंचावर आगमन होत असे.

गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि पं. रघुनंदन पणशीकर अशा तीन सांगीतिक पिढ्यांना त्यांनी साथसंगत केली होती.आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने गेल्या वर्षीच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त माउली टाकळकर यांना वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘गानसरस्वती महोत्सवा’त त्यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

Mumbai : डिसेंबरपर्यंत ग्रीन बाँड बाजारात; मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी BMC चा निर्णय