संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील अहमदनगर (आता अहिल्यानगर) जिल्हा पोलिसांनी राज्याचे ज्येष्ठ भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर ५३ जणांविरुद्ध शेतकऱ्यांना दिलेल्या ८.८६ कोटी रुपयांच्या कर्जवाटपातील कथित गैरप्रकारांबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील अहमदनगर (आता अहिल्यानगर) जिल्हा पोलिसांनी राज्याचे ज्येष्ठ भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर ५३ जणांविरुद्ध शेतकऱ्यांना दिलेल्या ८.८६ कोटी रुपयांच्या कर्जवाटपातील कथित गैरप्रकारांबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

ही कारवाई सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार करण्यात आली आहे. कोर्टाने २० वर्षे जुने असलेले हे प्रकरण ऐकून घेतले होते. हे प्रकरण विखे पाटील (वय ६५) यांच्या नियंत्रणाखालील एका साखर कारखान्याशी संबंधित आहे.

सुप्रीम कोर्टाने पोलिसांना आदेश दिला होता की, राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत मिळालेला निधी वळवण्यात आला असल्याच्या तक्रारींची चौकशी करावी आणि संबंधित व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवावा.

या निर्देशांनुसार, सोमवारी लोहगाव पोलिस स्टेशनमध्ये विखे पाटील आणि इतरांविरुद्ध FIR नोंदवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई