जयकुमार गोरे, संजय राऊत (डावीकडून) 
महाराष्ट्र

संजय राऊत, रोहित पवार आणि खासगी यूट्यूब चॅनेलविरोधात हक्कभंग; बदनामी केल्याप्रकरणी जयकुमार गोरे आक्रमक

२०१९ मध्ये न्यायालयाने निकाल देत प्रकरण निकाली काढले. मात्र ७ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रकरण उखडून काढत नाहक बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले गेले.

Swapnil S

मुंबई : २०१९ मध्ये न्यायालयाने निकाल देत प्रकरण निकाली काढले. मात्र ७ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रकरण उखडून काढत नाहक बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले गेले. व्हिडीओ क्लिप वायरल करत माझी, माझ्या कुटुंबीयांची व माझे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्यामुळे खासदार संजय राऊत, विधानसभा सदस्य रोहित पवार आणि खासगी यूट्यूब चॅनेल विरोधात हक्कभंग प्रस्ताव ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे मांडला. दरम्यान, गोरे यांनी मांडलेला हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

एखाद्या प्रकरणात न्यायालयाने निकाल देत दोषमुक्त केले आहे. तरीही राजकारणासाठी जुने व्हिडीओ वायरल करण्यात आले. व्हिडीओ वायरल केल्याने माझी, माझ्या कुटुंबीयांची व माझे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर नाहक बदनामी केली असून हा सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे मला टीकेचा सामना करावा लागला. तर विधानसभा सदस्य रोहित पवार यांनीही सभागृहात मुद्दा उपस्थित न करता सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांना माहिती देत माझी बदनामी केली, तर यूट्यूब चॅनलवर सतत व्हिडीओ व्हायरल करत बदनामी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम २७३, २७४ अन्वये संजय राऊत, रोहित पवार आणि यूट्यूब चॅनेलच्या संपादकाविरोधात हक्कभंग प्रस्ताव गोरे यांनी मांडला.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा