महाराष्ट्र

‘गणेशोत्सवात खासगी वाहनांना टोल माफ करा’

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनांना टोल माफी द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनांना टोल माफी द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातून लाखो गणेशभक्त कोकणातील गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. यावर्षी ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे ४ सप्टेंबरपासून कोकणातील गणेशभक्त हे आपल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने निघणार आहेत. शासनाने ४ सप्टेंबरपासून ते संपूर्ण गणेशोत्सवापर्यंत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना टोल माफी करण्याची त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल