महाराष्ट्र

पश्चिम रेल्वेवरील गाड्यांना पालघरला थांबा; अतिरिक्त थांब्याने पालघरवासीयांना दिलासा

पालघर स्थानकात लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबविण्याची प्रवाशांकडून मागणी करण्यात येत होती. प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील रेल्वेगाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : पालघर स्थानकात लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबविण्याची प्रवाशांकडून मागणी करण्यात येत होती. प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील रेल्वेगाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पालघरवासीयांना दिलासा आहे.

दोन रेल्वेगाड्यांना पालघर येथे अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२९५५/२२९५६ वांद्रे टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२४९०/१२४८९ दादर-बिकानेर एक्स्प्रेसना पालघर स्थानकावर थांबा देण्यात येण्यास सुरुवात झाली आहे. गाडी क्रमांक २२९५५ वांद्रे टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेसला अतिरिक्त थांबा आहे. ही गाडी पालघर स्थानकावर सायंकाळी ७ वाजता पोहोचेल आणि सायंकाळी ७.०२ वाजता पालघरवरून सुटेल. रेल्वे दोन मिनिटे पालघरमध्ये थांबेल.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश