संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचार संहिता केव्हा लागू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना येत्या १५ ते २० दिवसांत आचार संहिता लागू करण्यात येणार असल्याचे भाकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

नांदेडमध्ये आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना येत्या १५ ते २० दिवसात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. नांदेडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रामत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजरोहण करण्यात आले. शिवाय हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून महाजन यांनी स्मारकास अभिवादन केले.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला