महाराष्ट्र

कर्नाटक प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री गप्प का ? संजय राऊतांचा सवाल

कर्नाटकचे मुख्यमंत्री थेटपणे त्यांची भूमिका मांडत आहेत मात्र आमचे मुख्यमंत्री आहेत कुठे ? ते याविषयावर काही बोलत का नाहीत ?

प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न दिवसेंदिवस अधिक तापत चालला आहे. त्यावर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. मात्र, सत्ताधारी याबाबत अजून मौन बाळगून आहेत. अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांच्यावर थेट टीका केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री थेटपणे त्यांची भूमिका मांडत आहेत मात्र आमचे मुख्यमंत्री आहेत कुठे ? ते याविषयावर काही बोलत का नाहीत ? त्यांच्या तोंडाला कोणी कुलूप लावले आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सर्व खासदार काल अमित शहा यांना कर्नाटकच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भेटले मात्र, मिंधे सरकार अजून गप्पच आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले