महाराष्ट्र

धनगर आरक्षणासाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह नाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवला

Swapnil S

लातूर : लातूरमध्ये धनगर आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सरकारकडून आश्वासन मिळूनही अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण दिले जात नसल्याने संबंधित तरुणाने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली, असे बोलले जात आहे.

लातूर येथील आष्टी गावातील रहिवासी असलेल्या आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव रमेश चंद्रकांत फुले (वय, ३६) असे आहे. तो दुसऱ्याच्या शेतात मंजुरी करून आपली उपजीविका करायचा. सत्तेत आल्यानंतर धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु समाजाला आरक्षण मिळाले नाही. धनगर समाजाकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे, अशी भावना रमेश नेहमीच व्यक्त करायचा. धनगरांना एसटी आरक्षण मिळाल्यास तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील, असे रमेश फुले यांना वाटत होते. मात्र, अद्यापही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही, या नैराश्यातून रमेशने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या घेतली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रमेशचा मृतदेह नाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवला. जोपर्यंत नोकरीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत रमेश फुले यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

Mumbai Local Update : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक

प्रत्येक बालकाला २२ नोव्हेंबरला पोलिओचे डोस; मुंबईत रविवारी पल्स पोलिओ मोहीम; २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान लसीकरण

Instagram New Feature : स्टोरी पोस्ट करताना चूक झाली? टेन्शन नको! १५ मिनिटांत 'अशी' करा एडिट; जाणून घ्या सर्व प्रोसेस

Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल

Mumbai : तरुणीची छेड काढली, विरोध करताच दोघांना बेदम मारहाण; कुर्ल्यातील व्हायरल VIDEO प्रकरणी ८ अल्पवयीन ताब्यात