महाराष्ट्र

रात्री घराच्या अंगणात झोपलेल्या युवकाचा दगडाने डोके ठेचून खून, खटावमधील खळबळजनक घटना

पुसेगाव पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. रोहित (विकी) सावंत हा युवक खटाव, ता खटाव येथील आंबेडकर नगरमध्ये आईसह राहत होता.

Swapnil S

कराड : खटाव येथील आंबेडकरनगर येथे मध्यरात्री रोहित शांताराम सावंत (विकी) (वय ३०) या युवकाचा डोके दगडाने ठेचून अज्ञात मारेकऱ्याने खून केला. या घटनेमुळे आंबेडकरनगरसह खटावमध्ये प्रचंड खळबळ माजली. पुसेगाव पोलिसांनी पंचनामा केला असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात मृत युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुसेगाव पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. रोहित (विकी) सावंत हा युवक खटाव, ता खटाव येथील आंबेडकर नगरमध्ये आईसह राहत होता. त्याचे फारसे शिक्षण झाले नव्हते. त्यामुळे तो मिळेल ते काम करत होता. तो मंगल कार्यालयात केटरर्सच्या वतीने वाडपी काम करत होता, तर शेतकऱ्यांच्या शेत मालाची बाजारपेठेत नेण्यासाठी शेतीमाल भरणीसाठी जात होता. मंगळवारी रात्री तो घराच्या अंगणात एकटाच झोपत होता. सकाळी आईने त्याला मृत अवस्थेत पाहिले आणि आरडाओरडा केला. मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्याने डोक्यावर घाव घालत त्याचा खून केला होता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी सावंत यांच्या घराकडे धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस-घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, सुमित्रा शांताराम सावंत यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीवर ३०२ कलमानुसार गुन्हा नोंद झाला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत