मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या खुनातील मुख्य संशयितांपैकी एक झीशान अख्तर याला कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी दिली.
झीशान अख्तर (२२) याला बनावट पासपोर्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बाबा सिद्दीकी यांच्या खुनात सहभागी असलेल्या झीशान अख्तरला कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारतात आल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे कदम यांनी वृत्तसंस्थेलाला सांगितले.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, कैदेत असलेल्या गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने – अनमोल बिश्नोईने – झीशान अख्तर आणि शुभम लोणकर यांना बाबा सिद्दीकी यांचा खून करण्याचा सुपारी दिला होता.