प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

राज्यात झिकाचा धोका वाढला; १२६ रुग्णांची नोंद, सर्वाधिक ९७ रुग्ण पुण्यात

झिका आजाराने आरोग्य विभागासह नागरिकांचे टेन्शन वाढवले असून राज्यात १२६ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक ९७ रुग्ण पुण्यात आढळले आहेत.

Swapnil S

मुंबई : झिका आजाराने आरोग्य विभागासह नागरिकांचे टेन्शन वाढवले असून राज्यात १२६ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक ९७ रुग्ण पुण्यात आढळले आहेत. झिका विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर परिसरात स्क्रिनिंग करण्यात येत आहे. तसेच संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

झिका हा एडिस डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. विशेष म्हणजे हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक कीटक व्यवस्थापन अंतर्गत एडिस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण मोहिमेंतर्गत रुग्णाच्या तीन ते पाच किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्ताचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. तर गर्भवती महिलांचे रक्ताचे नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.

अशी घ्या काळजी!

गावातील सर्व पाणीसाठे वाहते करण्यात यावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत. घरातील जे पाणीसाठे रिकामे करता येत नाहीत, त्यामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा. निरुपयोगी टायर नष्ट करावेत, रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये राहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देऊ नये, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

झिका विषाणू रुग्णांची नोंद

  • पुणे - ९७

  • अहमदनगर संगमनेर - ११

  • पुणे ग्रामीण - ९

  • पिंपरी चिंचवड मनपा - ६

  • सांगली (मिरज) - १

  • कोल्हापूर - १

  • सोलापूर - १

  • राज्यात एकूण १२६ रुग्णांची नोंद

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री